-->

निजामपूर ग्रामपालिका तर्फे दिव्यांगाना ध्वज फडकविन्याचा मान निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२६ - निजामपूर येथे आझाद चौकात निजामपूर ग्रामपालिका तर्फे भारतीय प्रजासत्ताक दिन सार्वजनिक झेंडा उत्सव साजरा करण्यात आला असता, अध्यक्ष स्थान ग्रामपालिका चे सरपंच सौ शीतल गजानन शाह व उपसरपंच श्री शाम दादाजी पवार होते, निजामपूर गावातील ६५ दिव्यांगान प्रात्यनिधिक स्वरूपात ६ दिव्यांग मां.श्री शेखर भाई शाह,श्री सुनील वाणी,श्री प्रशांत सोनवणे,अय्युब वायद बेग,श्री चिंधू शेठ शिंपी, साबीया नाजीम वरती फुलांचा वर्षाव करण्यात आला, यांच्यापैकी मा.श्री चिंधु बंडू शिंपी यांनी ध्वज फडकविला, तसेच सर्व ६५ दिव्यांग बंधूंचे ग्रामपालिकेच्या सर्व सदस्यांतर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. व निजामपूर गावातील आय. टी.बी.पी. मध्ये प्रवेश मिळविणारी पहिली कन्या कु. फाल्गुनी योगेश्वर भामरे हिचा सत्कार ग्राम सदस्या सो.सोनाली चौधरी व जिजाबाई सोनवणे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.तदनंतर आदर्श विद्या मंदिर निजामपूर - जैताणे येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादीकरन केले व त्यानंतर निजामपूर अमरधाम येथे ,निजामपूर ग्रामपालिका व म्हसाई माता सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी म्हसाई माता सहकारी पतसंस्था चे संचालक मंडळ , ग्रामपालिका पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाबाबत ग्रामपालिके तर्फे म्हसाई माता पतसंस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post