माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेह मिलन मेळावा वालखेडा येथे अतिशय उत्साहात व आनंदामध्ये पार पडला. शिंदखेडा/वालखेडा ( विजय पाटील) दि.२१ - वालखेडा येथे २००५ ते २००६ साली इयत्ता दहावी मध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल अठरा वर्षांनी आज शाळेत एकत्र आले होते. अठरा वर्षांपूर्वीच्या या जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने आज कै. आण्णासाहेब रंगराव माधवराव पाटील शाळा गजबजली असल्याचे चित्र या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले. ज्या शाळेमध्ये शिकलो, लहानाचे मोठे झालो व गुरुजनांच्या शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो. असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, गुरुजनांना भेटावे, सोबत शिकत असलेल्या मित्र-मैत्रिणी यांच्याशी गप्पा माराव्यात. या संकल्पनेमधून २००५-०६ या वर्षांमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येक जण शाळा शिक्षक वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत या घटकांमुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटणी मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. या समारंभासाठी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा व कस्तुरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर रंगराव पाटील प्रमुख पाहुणे व माजी मुख्याध्यापक बापूसाहेब डी. जी. घरटे. सर कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे तत्कालीन प्राचार्य एस डी चव्हाण सर तसेच शाळेत अध्यापन करणारे आजी माजी अध्यापक आप्पासो एस. डी. पाटील,श्री. आर. पी. ठाकरे सर ,श्री. जी.बी.पाटील सर,श्री.आर.एस पवार सर,श्री. जी. एच. सिसोदे सर ,श्री एच. पी. वानखेडे सर.,श्री एस. आर. पाटील सर ,श्री एस. एम. ठाकरे सर ,श्री एन. आर. ठाकरे सर ,श्री बी. एस. भदाने सर ,श्री एस. एफ. पाटील सर ,सौ. वानखेडे मॅडम,सौ. ठाकरे मॅडम,श्री डी. पी. सिसोदे सर ,श्री एम. डी. शिरसाठ सर,श्री व्ही. एम. मोरे सर ,श्री पी. के. मोरे सर,श्री आर. आर. धनगर सर,शिक्षकेतर कर्मचारी श्री.अशोक नाना येळवे व निंबा वानखेडे हे उपस्थित होते. या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सरस्वती पूजन व कै.आण्णा साहेबांचे प्रतिमा पूजन करुन या एक दिवसीय शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सध्या मी कोण या सदरामधून प्रत्येकाने आप आपली ओळख करून दिली. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काही उपयोगी अशा भेटवस्तू दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी विजय पाटील,किरण भदाणे व अमित शिरसाठ यांनी केले. तर आभार प्रदर्शन व अनुमोदन महेंद्र गोसावी व दिपाली कांकरिया यांनी केले. सदरचा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी २०५-०६ बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विजय पाटील,महेंद्र गोसावी,शेरुद्दीन पिंजारी ,योगेश येळवे,प्रविण पाटील,मनीषा खैरनार ,सागर सनेर ,प्रतिभा ठाकरे,अरविंद महाजन,किरण भदाने,छाया येळवे,वैशाली खैरनार,सुष्मा पवार,प्रवीण बागुल,सुवर्णा ठाकरे, अनिता ठाकरे ,दीपाली कांकरिया,समाधान इंदासराव,कविता पवार,अमित शिरसाठ,शमिना पिंजारी,शिवपुरी गोसावी,संदीप कोळी,भारती अहिरे,मनोज पवार,महेंद्र पाटील,पुरुषोत्तम कोळी ,समाधान अहिरे,प्रभावती कोळी,पंकज इशी,भूषण पाटील,सुनिल कोळी,कल्पना पाटील,योगेश पाटील,सचिन पाटील,दत्तात्रय कोळी,सुरेश माळचे,महेश सावळे,कैलास मराठे,हीरालाल आखडमल,ईश्वर इंडाईत,लता पाटील,प्रवीण चव्हाण ,रतीलाल भारत येळवे,मुकेश पाटील,संदीप पाटील,पांडुरंग कोळी ,ईश्वर पाटील ई.विजय पाटील यांच्या अनोख्या सूत्र संचालन शैलीने या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post