सपोनि भामरेंचा कारवाईचा धडका सुरूच :कॉपर केबल चोर अटकेत निजामपुर पोलीसांची कारवाई निजामपुर (परवेज सैय्यद) दि.२५ - निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गावाचे शिवारात दिनांक २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ०४.००वाजेच्या सुमारास गेल अँन्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय. सी. आर. ०९ मधील कॉपर कॅबल वायर चोरीस गेलीत्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ००५१/२०२५ बीएनएस कलम ३०२ (२), ३(५) प्रमाणे दि.२२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनी/मयुरभामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुदगुन्हयातील आरोपी नामे देविदास बंडु थोरात ऊर्फ देव-या रा. रायपुर ता. साक्री जि. धुळे यास ताब्यात घेवुनत्यांचेकडुन चोरीस गेलेली कॉपर केबल वायरचा मुद्देमाल एकुण २६,१७५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुनजप्त करुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयाने एक दिवसाची पोलीसकोठडी रिमांड मंजुर केली असुन तो पोलीस कोठडी रिमांडमधे आहे तसेच इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीसअधिक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि / श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचेमार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि / श्री मयुर भामरे, पोउनि / प्रदिप सोनवणे,पोउनि/मधुकर सोमासे, पोसई/ यशवंत भामरे, श्रेपोसई / प्रभाकर गवळे, असई / रुपसिंग वळवी, पोहेकॉ / प्रशांत ठाकुर,पोहेकॉ /नारायण माळचे, पोहेकॉ / रतन मोरे, पोहेकॉ / नागेश्वर सोनवणे, पोहेकॉ / प्रदिप आखाडे, पोना / खंडेरावपवार,पोकॉ/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/ श्रीराम पदमर, पोकॉ/ अशोक तावडे, पोकॉ/ सागर थाटसिंगारे, पोकॉ/कृष्णाभिल, पोकॉ/ पृथ्वीराज शिंदे, पोकॉ / गौतम अहिरे, यांचे पथकाने केली आहे.
byloksahi.varta.news
-
0