पुणे दि.०१ - पुणे-पिंपरी गेल्या सहा वर्षांपासून पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या खान्देशी बांधवांसाठी कार्यरत असलेल्या खान्देश मराठा पाटील संघाच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा आनंद लाभला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खान्देशातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.संघाच्या या उपक्रमामुळे खान्देशी विद्यार्थी, होतकरू उद्योजक आणि नागरिकांना दिशा मिळत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक कार्य या सर्वच क्षेत्रांत संघाने उभा केलेला भक्कम आधारस्तंभ निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यातून अनेकांना मदतीचा हात मिळाला असून, खान्देशी संस्कृती, परंपरा आणि बंधुभाव वाढीस लागला आहे.कार्यक्रमाचे आयोजक व पदाधिकारी यांनी मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करून सन्मानित केले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! आपल्या खान्देशी मातीशी जोडलेली ही संस्था अशीच पुढे वाढत राहो आणि हजारो विद्यार्थ्यांना, तरुणांना व कुटुंबांना प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा!खान्देश मराठा पाटील संघाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या
byloksahi.varta.news
-
0