मुस्लिम समाज अध्यक्षनेच केला मुस्लिम तरुणाला मस्जिद मध्ये अपमानित..समाज अध्यक्ष वरती गुन्हा दाखल निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२७ मार्च रोजी २६ वा रोजा होता. ०९:३० ते १०:०० वाजेचे सुमारास फजल सय्यद निजामपुर गावातील जामा मशिदची नमाज अदा करुन मशिद मध्ये थाबले होते. त्यावेळी सर्व सर्व मुस्लिम समाज हे मशिद मध्ये थांबुन होते. सदर दिवशी मशिद मध्ये पुर्ण वर्ष काम कलेले व्यक्तीना भेट म्हणून मुस्लिम समजाचे लोक मिळुन काही रक्कम देण्याचे ठरवितात व सदर रक्कम ही गावातुन जमा करतात व देतात. त्यावेळी फजल मशिदीचे व समाज अध्यक्ष आसिफ हमिदुल्लाखान पठाण यांना जमा होणारा चंदा बाबत हिशोब विचारला असता त्यांनीसर्वांसमोर तु पाच वेळा नमाजला येत नाही, तु सभासद नाही, तुला विचारायचा अधिकार नाही, तुझी मला प्रश्न विचारायची अवकातनाही,असे बोलून फजल सय्यद ला सर्वांसमोर अपमानित करुन मानहानी केली. तेव्हा फजल ने त्यांना समजावुन सांगितले की गावातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला विचारु शकते, असे त्यांना सांगितले असता त्यांनी फजल ला जोरजोराने बोलुन तु आताचा आता मशिदी बाहेर निघ, असे बोलुन फजल ला अपमानित केले. दरम्यान पवित्र महिना रमजानचे उपवास असल्याने फजल सय्यद यांनी आज दि.२७ रोजी फिर्याद दिली असून निजामपूर पोलीस स्टेशनला मुस्लिम समाज अध्यक्ष आसिफ हमिदुल्लाखान पठाण यांच्या वरती भारतीय न्याय संहिता ३५६/२ प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे पुढील तपास हे.को माळचे करीत आहे
byloksahi.varta.news
-
0