-->

शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयाचा सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकाल निजामपूर (परवेज सैय्यद) दि.१४ - निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयचा एस. एस.सी. महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत सलग तिसऱ्या वर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे. स्वाती प्रभाकर गवळे याने ८६.२० टक्के मार्क्स मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला तर योगेश्वरी राहुल गवळे ८५.२० टक्के मार्क मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकावर कावेरी धनराज चव्हाण ७९.४० टक्के तर चौथ्या क्रमांकावर हुमेरा आरीफ पठाण हिने ७७.०० टक्के मिळविले आहेत. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, उपाध्यक्ष दुल्लभ जाधव, सचिव सुमंतकुमार शाह, खजिनदार भिकनलाल जयस्वाल, विश्वस्त मोहन सूर्यवंशी, वासुदेव बदामे, योगिता शाह, यश शाह, मुख्याध्यापक डॉ मनोज भागवत, प्रमोद कुवर, ललित सोनवणे, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post