एनसीसीच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराला धुळे येथे उत्साहात प्रारंभ धुळे ०९ - देशसेवेतील एनसीसीचं मोलाचं योगदान – कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता यांचा संदेश देशातील युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवून त्यांना सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) स्थापना करण्यात आली आहे. युवकांनी एनसीसीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन देशसेवेत आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता यांनी केले.ते मंगळवारी दि. ०८ जुलै धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू झालेल्या एनसीसीच्या संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतील एकूण ४६१ छात्रसेनिक सहभागी झाले आहेत. शिबिरामध्ये छात्रसेनिकांना ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन, अंबुश, पेट्रोल, फायर फायटिंग, यासोबतच आपत्कालीन परिस्थितीतली तयारी, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा आणि भारतीय सैन्याचा इतिहास यासंबंधी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.शिबिराच्या कालावधीत फायरिंग सराव व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व छात्रसेनिकांसाठी अल्पोपहार, भोजनाची व निवासाची सुविधा एनसीसी बटालियनतर्फे करण्यात आली आहे.शिस्तबद्ध आणि वेळेच्या चौकटीत प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता व प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन सुनील पाटील , लेफ्टनंट चंदनशिव , सुभेदार मेजर तिलकराज, फर्स्ट ऑफिसर स्मित वाघ, सेकंड ऑफिसर राजपूत, फर्स्ट ऑफिसर बोरसे ,ट्रेनिंग जेसीओ करमजीत सिंग, बी एच एम दीपक पाटील, हेड क्लर्क प्रदीप शिंदे, ट्रेनिंग क्लर्क संपदा कुलकर्णी , सीटीओ आश्विनी देशमुख शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
byloksahi.varta.news
-
0