एनसीसी प्रशिक्षण शिबिर धुळे येथे विद्यार्थ्यांना कवायतीचे धडे धुळे ०९ -एनसीसी प्रशिक्षण शिबिर धुळे येथे विद्यार्थ्यांना कवायतीचे धडे ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी धुळे मार्फत जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक ०८ जुलै ते १७ जुलै २०२५ या कालावधी अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यां चा शारीरिक व बौद्धिक विकासात वाढ होण्याच्या अनुषंगाने त्यांना प्रशिक्षित केले जाते . एनसीसी शिबिरातील ४६१ विद्यार्थी सहभागी झालेले आहेतशिस्तबद्ध आणि वेळेच्या चौकटीत प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता व प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन डॉ .सुनील पाटील , लेफ्टनंट डॉ .राजेश चंदनशिव , सुभेदार मेजर तिलकराज, फर्स्ट ऑफिसर स्मित वाघ, सेकंड ऑफिसर राहुलसिंग राजपूत, फर्स्ट ऑफिसर बोरसे ,ट्रेनिंग जेसीओ करमजीत सिंग, बी एच एम दीपक पाटील, हेड क्लर्क प्रदीप शिंदे, ट्रेनिंग क्लर्क संपदा कुलकर्णी , सीटीओ आश्विनी देशमुख , राकेश पावरा शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post