दि.१५ - गंगामाई इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत "व्यक्तिमत्व विकास व सकारात्मक दृष्टिकोन" यावर एक दिवसीय कार्यशाळा नगांव नगांव येथील गंगामाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व उत्तुंग भरारी फौंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "व्यक्तिमत्व विकास व सकारात्मक दृष्टिकोन " या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाट्न संस्थेचे सचिव मनोहर भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यशाळेत सामंजस्य करार ही महाविद्यालया मार्फत करण्यात आला.उत्तुंग भरारी फौंडेशन,मुंबई चे संस्थापक श्री नितीन पाटील यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, ध्येय प्राप्ती, सकारात्मक दृष्टिकोन, संभाषण कौशल्य, वेळेचे योग्य नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले.या कार्यशाळेचे प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा व विद्यार्थ्यांनी जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपला माईंडसेट ही सकारात्मक ठेवावा हा होता.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव मनोहर भदाणे, उपाध्यक्षा ज्ञानज्योती भदाणे, अध्यक्ष राम भदाणे यांनी कौतुक केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस व्ही चोरडिया व सर्व शिक्षकांचे या कार्यशाळेच्या यशस्वीते करता मोलाचे मार्गदर्शन लाभले.
byloksahi.varta.news
-
0