भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमतीत्त नगांव येथे गंगामाई महाविद्यालयाच्या प्रागणांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम संपन्न धुळे - दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी नगांव येथे गंगामाई महाविद्यालयाच्या प्राणांगणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.भिमराव रामजी ज्यांना आपण सर्वजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम हा महानिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महानिर्वाण दिवसाच्या दिवशी नगांव एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाखांच्या उपस्थितीत गंगामाई शैक्षणिक संकुलात उभारलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भाजपाचे जेष्ठ नेते माजी जि.प.अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सामुहिक अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगांव एज्युकेशन सोसायटी व गंगामाई एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जि.प.सदस्य राम भदाणे यांचे स्विय सहाय्यक
byloksahi.varta.news
-
0