धुळे - दि.१० गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक चे मानांकन नगांव: येथील नगांव एज्युकेशन सोसायटी संचलित गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक ऍक्रेडिटेशन चे मानांकन प्राप्त झाले आहे.नॅक ही देशातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्या करता कार्यरत असून विविध निकषांवर आधारित गुणांद्वारे महाविद्यालयातील अध्यापन , अध्ययन , मूलभूत सुविधा , प्लेसमेंट , शिक्षक-विद्यार्थी संवाद , महाविद्यालयाचा निकाल संशोधन विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा अशा अनेक मापदंड लावून परीक्षण करते. नोव्हेंबरमध्ये देशातील विविध राज्यातील तीन तज्ञांनी महाविद्यालयास भेट देऊन पाहणी केली , त्यानुसार महाविद्यालयास मानांकन देण्यात आले. गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय शहरापासून थोड्या अंतरावर असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. महाविद्यालयास कडून नॅक ऍक्रेडिटेशन होणे हीअभिमानास्पद बाब आहे. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री. बाळासाहेब मनोहर भदाणे , अध्यक्ष मा.श्री.राम दादा भदाणे , उपाध्यक्ष मा. सौ. ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांनी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले .
byloksahi.varta.news
-
0