दि.११ नगांव गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास नॅकचे बी+ राष्ट्रीय मानांकन. नगाव:- नगाव एज्युकेशन सोसायटी' चे गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परीषदेद्वारे (नॅक) बी + मूल्यांकन प्राप्त झाले. मूल्यांकन प्रक्रिया दि. २६ व २७ डिसेंबर २०२३ रोजी बंगळुरू येथील राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद समितीद्वारे महाविद्यालयाची दोन दिवस पाहणी करण्यात आली होती. यातील शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रमाचे नियोजन, प्राद्यापकांची शैक्षणिक पात्रता व संशोधनकार्य, सुविधा, क्रीडा व सांस्कृतिक विभागाची कामगिरी, पर्यावरणपूरक योजनांबाबत अहवाल अशा अनेक गोष्टीची पाहणी केली होती. गंगामाई फार्मसी महाविद्यालयाने पहिल्याच सायकलमध्ये बी + नामांकन मिळाल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्थापनेपासून या संस्थेने विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासास हातभार लावला आहे. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण असावे, हे संस्थेचे चेअरमन माननीय राघवेंद्र (राम ) भदाणे यांचे ध्येय्य आहे. गंगामाई फार्मसी महाविद्यालय हे सन २००६ पासून सुरु झाले असून आजपर्यंत अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी हे यशस्वी उद्योजक असून प्रशासकीय सेवेत आहेत.देशातील विविध तज्ञानी नॅक समितीचे प्रमुख म्हणून महाविद्यालयाच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी प्राचार्य डॉ. वैभवकुमार अरुण जगताप यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाची माहिती समितीस दिली. मूल्यांकन प्रक्रियेत सर्व विध्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी व विविध आस्थापनांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राघवेंद्र (राम ) भदाणे, सचिव बाळासाहेब मनोहरजी भदाणे व उपअध्यक्ष माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे यांनी प्राचार्यं डॉ. वैभवकुमार अरुण जगताप, उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद, नॅक आयक्यूएसी इंनचार्ज डॉ. विनोद तुकाराम वाघ व डॉ. तबरेज मुजावर, प्रा. गोपीचंद भोई, डॉ. भूषण माळी, डॉ. निलेश सिसोदे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. ज्योत्स्ना खेडकर, प्रा. तुषार साळुंखे, प्रा. शलाका बोरसे, प्रा. अनवर चौधरी, प्रा. आसिफ अन्सारी, प्रा. सज्जाद अन्सारी, प्रा. कुंदन देवरे, प्रा. हर्षदा बाफना, प्रा. प्रिया डुले, प्रा. श्वेता यादव, प्रा. जयश्री पावरा, प्रा. कुणाल पाटील, प्रा. गोडम पाटील, प्रा आकांक्षा मोरे, प्रा. प्रतीक भडागे, प्रा. कल्याणी महाजन, प्रा. ऋषिकेश गारकर व इतर प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी महेंद्र पाटील, शांताराम सोनवणे आदींचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालय येणाऱ्या काळातही शैक्षणिक गुणवत्ता व विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वैभवकुमार जगताप यांनी केले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post