दि.०१ धुळे - गंगामाई फार्मसी महाविद्यालयाचे प्राद्यापक गोपीचंद काशीराम भोई यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ स्पर्धा पूर्ण केले. नगाव: नगाव एज्युकेशन सोसायटी चे गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय नगाव, येथील प्राद्यापक गोपीचंद काशीराम भोई यांनी टाटा मुंबई फुल मॅरेथॉन २०२४ चे ४२ कि.मी अंतर नुकतेच पूर्ण केले. विशेष म्हणजे हि आशियातील सर्वात मोठी स्पर्धा समजली जाते. त्याची सुरुवात २१ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ५ वाजता शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथून सुरुवात झाली. या स्पर्धेत देश व विदेशातील एकूण ५९,५१५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तरी या स्पर्धेत प्राद्यापक गोपीचंद भोई यांना ४२.१९५ किमी अंतर पूर्ण करण्यासाठी ५ तास ९ मिनिट लागले होते. विशेष म्हणजे प्राद्यापक म्हणून १८ वर्षे अनुभव असलेले या वयात हि स्पर्धा पार करणे खूप अवघड असले तरी सुद्धा त्यावर मात करत त्यांनी हि स्पर्धा यशस्वीपणे पार केलेली आहे. त्यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष मा. राघवेंद्र भदाणे, सचिव मा. मनोहरजी भदाणे व उपाध्यक्ष माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभवकुमार जगताप, उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद, डी. फार्मसी चे प्रमुख डॉ. विनोद वाघ व इतर प्राद्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केले. यावेळी प्राद्यापक गोपीचंद भोई यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले कि, निरोगी आरोग्य जगण्यासाठी सर्वांना व्यायाम व रनिंग करणे खूप आवश्यक आहे. फक्त त्यासाठी पाहिजे ती मनातील जिद्ध व चिकाटी.
byloksahi.varta.news
-
0