नगांव दि. १९ - गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात ३९४ वी शिवजयंती उत्साहात साजरीनगांव- नगांव येथील नगांव एज्युकेशन सोसायटीचे गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी, महाविद्यालयात ३९४ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. मनोहरजी भदाणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आता तलवारीची गरज नाही, फक्त गरज आहे ती महारांजाच्या विचाराप्रमाणे वाटचाल करण्याची. याचवेळी नगांव एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा मा. माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि शिवाजी महाराज शुरविर का घडले? कारण माता जिजांऊ मध्ये तसे गुण होते. यावेळी उदाहरण देतांना सांगितले की, प्रत्येक स्त्रीने अभिमानाने सांगितले पाहिजे की, माझ्या पोटी शिवाजी जन्माला आला पाहीजे असे विचार प्रत्येक स्त्रीने ठेवले तर नक्कीच आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणुन लाभलेले प्रा. सतिष अहिरे यांनी सांगितले की, शिवाजीमहाराजांचे गुण आचरण करणे काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देतांना सांगितले कि, महाराजांचे विविध सुप्त गुण जसे की, स्त्रीयांचा आदर, व्यसनाबद्दल जागररूकता, कोणाचीही धार्मिक भावना न दुखावणे, अंधश्रध्दा निर्मुलन, सर्वधर्म समभाव आदि गुण प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. तरच जयंती साजरी करणे म्हणता येईल. यावेळी सकाळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढली होती त्यावेळी वातारण अतिशय शिवकालीन झाले होते. अशाप्रकारे शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन नगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. बाळासाहेब मनोहरजी भदाणे, उपाध्यक्षा मा. माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे, गंगामाई सिनीअर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभवकुमार जगताप, उपप्राचार्य डॉ सुफियान अहमद , डि फार्मसीचे प्रमुख डॉ. विनोद वाघ व इतर प्राद्यापकवृन्द, विद्यार्थी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सास्कृतीक विभागाचे प्रमुख प्रा. कुनाल पाटील, प्रा. प्रिया डूले, प्रा. कविता पाठक, प्रा. करीना पिंजारी आदींनी परीश्रम घेतले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुनाल बडगुजर याने केले व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. वैभवकुमार जगताप यांनी मानले.
byloksahi.varta.news
-
0