-->

*खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्या मार्गदर्शनाने व भाजयुमो अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात पैलवान दादा कोळी यांचा भाजपात अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश |* धुळे दि. १६ (दादा कोळी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत तसेच भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी व पंकज धात्रक यांच्या नेतृत्वाखाली पैलवान दादा कोळी रा नगाव (ता. धुळे) यांच्यासह सुमारे दोनशेहून अधिक तरुणांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.येथील पारोळा रोडवरील खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या संपर्क कार्यालयात आज सकाळी हा पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, पंकज धात्रक, नगरसेवक अमोल मासुळे, नगरसेविका योगिता ताई कार्यक्रमास उपस्थित होते .


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post