आदिवासीं समाजाचे युवानेते मा.महेंद्रभाऊ बोरसे यांचा आझाद समाज पार्टीत प्रवेश आणि जिल्हा संघटक पदी नियुक्ती.. धुळे दि.१८ - आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.चंद्रशेखरभाई आझाद यांच्या कार्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.आनंदजी लोंढे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या धुळे जिल्ह्यातील कार्यालय येथे आदिवासीं समाजाचे प्रमुख युवा नेते मा.महेंद्रभाऊ बोरसे यांनी आझाद समाज पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांची आझाद समाज पार्टीच्या धुळे जिल्हा संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली.* यावेळी आजाद समाज पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृत सागर, धुळे शहर अध्यक्ष भैय्या वाघ आणि आदिवासी समाजाचे युवा नेते पवणभाऊ वाघ,किशोरभाऊ गायकवाड, महेंद्रभाऊ माळी, सतीश भाऊ ठाकरे,मंदा भाऊ सूर्यवंशी, तसेच यावेळी जेष्ठ नेते मुकुंदराव (बापूजी)शिरसाठ, राजसाहेब साळवे हे देखील उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या मूलभूत अधिकारांसाठी,शासनाच्या विवीध योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचवण्यासाठी.. राबवण्यासाठी.. आझाद समाज पार्टी कटिबध्द राहीन असे मत प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांनी व्यक्त केले.
byloksahi.varta.news
-
0