-->

धुळे -१६ .(गोकुळ देवरे) राज्य शासनाने समाज भुषण म्हणून सन्मानीत केलेल्या धुळ्यातील समाज भुषणांचा धुळे जिल्हा मुळ मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज दैनिक आपला महाराष्ट्र कार्यालयात जेष्ठ पत्रकार व संपादक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेवक‌ व्यक्तीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला त्यात येथील गृहरक्षक दलाचे माजी समादेशक राजेंद्र जीरेकर.खानदेश तेली समाजाचे कैलास चौधरी.जयहिंद शैक्षणिक संस्थेचे संचालक प्रा.मोहन मोरे, राष्ट्रीय काँग्रेसचे भिवसन अहिरे,आर.पी.आय आठवले गटाचे शशिकांत वाघ, खानदेश शिंपी समाज अध्यक्षा व धुळे जिल्हा मुळ मराठी पत्रकार संघाच्या सदस्या मोनिका शिंपी, सामाजिक कार्यकर्ते काॅ.रामदास जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित दैनिक पथदर्शी संपादक व जेष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे,संघाचे सेक्रेटरी डि.बी.पाटील, अध्यक्षस्थानी रमेश दाणे हे होते सर्व मान्यवरांचे हस्ते समाज भुषण पुरस्कार प्राप्त समाज सेवकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे नुतन अध्यक्ष यशवंत हरणे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सुनिल पाटील केले सर्व नुतन पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post