मा.आमदार कै.आण्णासाहेब द.वा.पाटील यांच्या स्मृतिदिनी नगांव शैक्षणिक संकुलात शक्तीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न धुळे दि. २१- तालुक्यातील नगांव येथून समाजकार्य करत सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद अध्यक्ष व चार वेळा आमदारकी पर्यंत धुळे व शिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यात आपला राजकीय दबदबा निर्माण करणारे, गोर गरीब जनतेचे कैवारी माजी आमदार कै आण्णासाहेब द.वा.पाटील यांचा नामलौकिक यापुढेही असाच कायम ठेवण्याचे कार्य आपल्या सर्वांना करावयाचे आहे असे प्रतिपादन आजच्या आण्णासाहेबाांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनपर आयोजित कार्यक्रमात भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र(राम)भदाणे-पाटील यांनी केले.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब मनोहर भदाणे, लोकनियुक्त सरपंच सौ.ज्ञानज्योतीमाई भदाणे यांच्यासह धुळे व शिंदखेडा तालुक्यातील आण्णासाहेबांवर प्रेम करणारी जनता मोठ्‌‍या संख्येने शक्तीस्थळावर अभिवादनासाठी उपस्थित होते. पुढे बोलतांना राघवेंद्र(राम) भदाणे-पाटील म्हणाले, आण्णासाहेब नेहमी गोर गरीब जनतेसाठी राजकारणापलिकडे नेहमी मदतीचा हात देऊन सर्व सामान्यांचे काम करत होते, धुळे तालुक्यात ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री फक्त आण्णासाहेबांमुळेच आली, आण्णासाहेबांनी खऱ्या अर्थाने राजकारणात चांगल्या आचार-विचारांचा आदर्श ठेवला आहे, लोकसेवा कार्य हे सर्वाधिक महत्वाचे आहे. माध्यम कोणतेही असो पण लोकांची सेवा झाली पाहिजे ही शिकवण त्यांनी आपल्याला आण्णासाहेबांकडून मिळालेली आहे. त्यांची सतत कार्यरत राहण्याची वृत्ती व गोर गरिबांच्या कल्याणासाठी उभा केलेला संघर्ष यातून कायम सकारात्मक उर्जा आपल्याला आज मिळते आहे. सामन्य जनतेप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता प्रत्येकाच्या मनात आजही कायम आहे असे त्यांचे महान कार्य, तेच कार्य पुढे वाढविण्यासाठी आपण सर्वांनी कायम प्रयत्नशील रहावे हीच खरी आण्णासाहेबांना श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी बोलतांना राघवेंद्र (राम) भदाणे-पाटील म्हणालेत. यावेळी धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी आण्णसाहेबांचा स्वतःला लाभलेला सहवास आपल्या शब्दात व्यक्त करून दाखवला, अनेक जुन्या आठवणींना यावेळी उजळा दिला. माजी आमदार आण्णासाहेब द. वा.पाटील यांच्या स्मृतिस्थळावर दुपारपर्यंत धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील जनता अभिवादनासाठी येत होती. याप्रसंगी नगांव एज्युकेशन सोसायटी व गंगामाई एज्युकेशन ट्रस्ट संचलित तालुक्यातील अनुदानित व विनाअनुदानित सर्व महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक, प्राथमिक शाळा तसेच इंजिनिअरींग,बी.फार्मसी, डी फार्मसी, पॉलीटेकनिक, आयटीआय, डी.एड, बी.एड महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post