-->

धुलिवंदनाच्या दिवशी रतनपूऱ्यात कुस्त्यांची दंगल जि.प.सदस्य राघवेंद्र(राम) भदाणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन धुळे ता.२६- धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन वद्य प्रतिपदेस संपूर्ण राज्यासह भारतात साजरा करण्यात येतो. या धुलिवंदनाचे औचीत्य साधून धुळे तालुक्यात रतनपुरा येथे कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते या वर्षीही सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र(राम) भदाणे-पाटील यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावून करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्य प्रभाकर आबा पाटील, माजी पं.स.सभापती सखाराम पाटील, माजी सरपंच सुनिल चौधरी, आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी बोलतांना राघवेंद्र (राम) भदाणे म्हणालेत कुस्ती हा भारताचा पारंपारिक खेळ आहे. १८९६ मध्ये आधुनिक ऑलिम्पिक खेळ सुरू झाले तेव्हा त्यात कुस्तीचा समावेश करण्यात आला. आधुनिक ऑलिम्पिक खेळांचे शिल्पकार कुवर्तन हे स्वतः कुस्तीपटू होते. कुस्ती हा खेळ खेळण्यासाठी तुमची तब्येत चांगली असायला हवी आणि तुमच्यात चपळता आणि ताकद दोन्ही असायला हव्यात, तरच तुम्ही कुस्ती खेळ खेळू शकता अन्यथा हा खेळ तुम्ही केव्हाही खेळाल तेव्हा तुमचा पराभव होईल. कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. जत्रा, यात्रा, उरुसातुन कुस्तीच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. पुढे- पुढे कुस्ती वेळ-काळा नुसार बदलत गेली, ती विविध नियमांनी बांधली गेली, मातीतुन थेट आता मॅट वर कुस्त्या खेळल्या जात आहेत. आता जागतिक स्तरापर्यंत कुस्ती स्पर्धा पोहचली आहे अशी कुस्ती संदर्भातील माहिती उपस्थितांसमोर दिली. यावेळी राघवेंद्र (राम) भदाणे यांनी उपस्थितांना होळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्यात सालाबादाप्रमाणे धुलीवंदन निमित्ताने काल दि.२५ रोजी झालेल्या कुस्तीची दंगल कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत भाजपाचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि.प.सदस्य राघवेंद्र (राम) भदाणे जि.प.सदस्य श्री.प्रभाकर आबा भदाणे, माजी उपसभापती सखाराम पाटील, माजी सरपंच सुनील दादा चौधरी, माजी सरपंच छोटू काशिनाथ पाटील, माजी सरपंच गयभु आप्पा उर्फ प्रभाकर माळी, मधुकर माळी जगदीश माळी, बन्टी भाऊ मालचे गावातील पंचक्रोषीतील भाजपाचे पदाधिकारी व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कुस्त्याना मालेगांव, जळगांव, धुळे जिल्ह्यातील कुस्तीपटू मोठ्या संख्येने आलेले होते.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post