शिंदखेडा/धुळे दि.११- शिंदखेडा तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजेंद्र छबीलाल पाटील यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा...! या बाबत वृत्त असे कि सध्या देशात निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत याचं पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर हे पक्षाचे निष्ठावंत सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जातात.ते अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्ष संघटन वाढीसाठी अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न करत होते या येत्या लोकसभा निवडणुक करिता धुळे लोकसभेसाठी इच्छुक ही होते.आणि तशी त्याची तयारी होती परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारले या कारणास्तव या नेत्यावर अन्याय मान्य नाही कारणास्तव विजेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे यांच्या कडे पाठवले आहे.या पत्रास पक्षश्रेष्ठीं काय निर्णय घेतात याकडे शिंदखेडा तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्ते पाहात आहेत.श्याम दादा सनेर सारख्या निष्ठावंत माणसाला जर का पक्षश्रेष्ठी असा न्याय देत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय ? हाच प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना मनाला बोचत आहे आणि आज खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी स्वर्गवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब सारख्या नेतृत्वाची सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना आठवण करून दिली त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनापासून धन्यवाद आज जर का साहेब राहिले असते तर कित्येक लोकसभा च्या मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उमेदवारी श्याम दादा तुम्हीच आमचे उमेदवार व तुम्हीच निवडणुक लढावी यासाठी दादांच्या घरी आले असते या बाबत बसून श्याम दादांनसाठी उमेदवारी करिता चर्चा केली असती आणि विनवण्या देखील केले असत्या पण शेवटी देवाने साहेबांना आपल्यातून हिरावून घेतले म्हणून आज आपल्यावर ही वेळ आहे मी तर खूप छोटा कार्यकर्ता आहे परंतु शाम दादांना आता एकच सांगेल दादा आता बस झालं अन्याय सहन नाही होत आपण खूप अन्याय सोचला अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जबाबदार असतो हे देखील आपण विसरत आहेत योग्य वेळेवर आपण योग्य तो निर्णय घ्यावा ही आपणास नम्र विनंती आपल्या निर्णयाला शिंदखेडा मतदारसंघातील प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे अनुमोदन असेल यात आपण कुठलीही शंका मनात ठेवू नका आणि पक्षश्रेष्ठींनी शाम दादा सनेर सारख्या निष्ठावंत माणसाला उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेस काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे.
byloksahi.varta.news
-
0