विंचूर दि.०३ धुळे विंचूर येथे धुळे लोकसभा निवडणूक संदर्भात भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.डॉ.सुभाषजी भामरे यांच्या यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना मागील १० वर्षांच्या काळात देशभरात रस्ते-महामार्ग,शिक्षण,स्वास्थ्य तसेच सर्वच क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे.केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या.यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनताही अनेक महत्वपूर्ण सुविधांचा लाभ घेऊ शकत आहे. यावेळीही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजप-महायुतीला जनता विजयी करेलच असा विश्वास खा.सुभाषजी भामरे यांनी व्यक्त केला.धुळे ग्रामीण मतदारसंघ हा विकासाच्या वाटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासरथात सामील होणार आहे,त्यामुळे अंगी कर्तृत्व आणि विकासाची क्षमता असलेल्या खा.सुभाषजी भामरे साहेब यांना धुळे ग्रामीण मतदारसंघातुन सर्वाधिक लीड मिळेल,असा विश्वास यावेळी मी व्यक्त केला. यावेळी खा.सुभाषजी भामरे साहेब,महाराष्ट्र प्रवक्ते श्री.संजयजी शर्मा,भाजप किसान सेलचे प्रदेशउपाध्यक्ष बापूसाहेब खलाणे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अरविंद जाधव सर,श्री.भाऊसाहेब देसले,जिल्हासरचिटणीस श्री.किशोरजी सिंघवी,श्री.बाळासाहेब भदाणे,जिल्हा परिषद सदस्य श्री.संग्राम आबा पाटील,श्री.राम भदाणे,श्री.आशुतोष पाटील,धुळे पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी,उपसभापती भैय्यासाहेब पाटील,पं.सं.सदस्य बाबाजी देसले,बोरकुंडचे मा.संरपंच श्री.राजेंद्र मराठे,तरवाडे संरपच श्री. जितू माळी,दोदवाड उपसंरपंच रवींद्र बिऱ्हाडे,श्री.जितेंद्र जैन,श्री.अनिल जयस्वाल,डॉ.श्री.अनिल पाटील,डॉ.श्री.कुणाल पाटील,श्री.रावसाहेब माळी,श्री.शरद पाटील,श्री.बाळासाहेब देसले,श्री.प्रकाश देसले व ग्रामस्थ व भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
byloksahi.varta.news
-
0