-->

महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी, यांनी प्रवासभत्ता बिलाच्या १०टक्क्याप्रमाणे लाच स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले गुन्हा दाखल साक्री/पिंपळनेर दि. ०७ ( परवेज सैय्यद ) - श्रीमती शुभांगी बनसोडे, महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती साकी अंतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पिंपळनेर ता. साकी जि. धुळे यांनी तक्रारदार यांचेकडून प्रवासभत्ता बिलाच्या १० टक्क्याप्रमाणे ५४,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले म्हणून गुन्हा दाखलतकारदार हया पंचायत समिती साकी अंतर्गत, महिला बालकल्याण केंद्र, पिंपळनेर येथे पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांचे इतर ६ कार्यालयीन सहकारी असे सर्वांचे ९,३७,५३३/- रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजुर होवुन प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावुन घेवुन प्रवास भत्ता मंजुर झालेल्या कर्मचा-यांचा प्रवासभत्ता काढुन दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडुन १० टक्के प्रमाणे एकुण ९३,०००/- रुपये जमा करुन आणुन देण्यास सांगुन पैसे दिले नाही तर पुढील प्रवासभत्त्याची बिले काढुन देणार नाही असे सांगितल्याने तकारदार यांनी दि. ०६.०५.२०२४ रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दि.०६.०५.२०२४ रोजी पडताळणी केलीअसता श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे सर्व कर्मचा-यांच्या प्रवासभत्ता बिलाचे १०टक्के प्रमाणे ९३,७५३/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी प्रवासभत्ता जमा झालेल्या काही कर्मचा-यांकडुन त्यांच्या जमा झालेल्याप्रवासभत्त्याच्या बिला प्रमाणे १० टक्के अशी ५४,०००/- रुपये रक्कम जमा करुन सदर लाचेची रक्कम दि. ०७.०५.२०२४ रोजी पिंपळनेर महिला बाल कल्याण केंद्र कार्यालयातील आरोपी शुभांगी बनसोडे यांना त्यांचे कक्षात पंचासमक्ष स्वतः स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द भ्र.प्र. अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेडडी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post