ग्रीन नगांव टीम चे हार्दिक हार्दिक अभिनंदन.... नगांव दि.२३ जून २०२४ रोजी सकाळी ०९:०० च्या दरम्यान नगांव गावात ग्रीन नगांव टीम ने खंडेराव मंदिर परिसरात ५०० सीड बॉल रोपण केले तसेच नगांव ग्रामस्थानी मिळून १०० पेक्षा अधिक वृक्षारोपण केले....नगांव ग्रामस्थांनी खूप आनंदी वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेत वृक्षारोपण करून त्याची संगोपणाची जबाबदारी पण स्वीकारली नगांव ग्रीन टीम व ग्रामस्थांनी मिळून ही मोहीम हाती घेतली आहे....खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग वाढतो आहे....लवकरच आपण ग्रीन नगांव करण्यात यशस्वी नक्कीच होऊ.... असे या वेळी ग्रामस्थ म्हणाले
byloksahi.varta.news
-
0