धुळे दि.२४.(गोकुळ देवरे) - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे दि.२४.०६.२०२४ लोकसेवक नारायण पोपट फुलपगारे, शिपाई, अपर तहसिल कार्यालय, धुळे शहर यांना तक्रारदार यांचेकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम फोनपे अँपव्दारे स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले म्हणुन गुन्हा दाखल.तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असुन तकारदार हे ट्रॅक्टरने धुळे शहरात वडेल रोड वलवाडी परिसरात दि.२५.११.२०२२ रोजी वाळु वाहतुक करीत असतांना तलाठी देवपुर वलवाडी यांनी सदरचे टॅक्टर थांबवुन त्याचा पंचनामा करुन अपर तहसिल कार्यालय,धुळे शहर येथे जमा करुन तक्रारदार यांना १,३०,५००/- रुपये दंडाची नोटीस दिली होती.सदर दंडाची रक्कम तक्रारदार यांनी दि.०६.०६.२०२४ रोजी चलनाव्दारे बँकेत भरुन सदरचे चलन पावती अपर तहसिल कार्यालयात जमा केली होती. त्यानंतर तकारदार हे त्यांचे ट्रॅक्टर ताब्यात घेण्याकरीता तहसिल कार्यालयात गेले असता त्यांची त्या कार्यालयातील शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांची भेट झाली असता शिपाई फुलपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे टॅक्टर सोडुन देण्याचे काम करुन देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभाग, धुळे कार्यालयात दि.०७.०६.२०२४ रोजी समक्ष येवुन दिली होती. त्या अनुषंगाने दि. ०७.०६.२०२४ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता शिपाई फुलपगारे यांनी तक्रारदार यांचे टॅक्टर सोडुन देण्याचे काम करण्या करीता तडजोडी अंती दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आज दि.२४.०६.२०२४ रोजी तकारदार यांनी पंचासमक्ष शिपाई फुलपगारे यांची भेट घेतली असता त्यांनी तडजोडीअंती दोन हजार रूपये लाचेची रक्कम फोनपे अँपव्दारे स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेतले असुन शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री.अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक श्री.माधव रेडडी व वाचक पोलीस उप अधीक्षक श्री. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
byloksahi.varta.news
-
0