-->

धुळे दि.२४.(गोकुळ देवरे) - मुखी हरी नामाचा गजर खांद्यावर ध्वज घेवून पंढरीच्या वाटे निघालेले दुरदुरचे विठू माऊलींचे वारकरी..! दरवर्षी प्रमाणे शिंदखेडा येथील मठाधिपती ह.प‌.मेघश्याम महाराज यांच्या पंढरपूर पायी वारी निघालेल्या दिंडीचे धुळे शहरातील विद्यानगरी परिसरात नरेंद्र भटू पाटील यांच्या निवासस्थानी आगमन झाले.तिथे नाश्ता देवून या ठिकाणी दिडींतील वारकरीनां विविध वृक्षांचे बी गोकुळ देवरे यांनी संकलीत केलेले बी चिंच,रिठ्ठा, निंब, बहावा, रेन ट्री, करंज अश्या विविध प्रकारच्या झाडांचे बी चे पाकीट देवून स्वागत करुन‌ बी वाटेवर रूजवण्याची विनंती केली निसर्ग मित्र समितीचे महासचिव संतोषआबा पाटील यांनी या उपक्रमाचे प्रस्ताविक करून सुरूवात केली. दरवर्षी उन्हाचे वाढते प्रमाण झाडांची कमी होणारी संख्या याकरिता छोटासा प्रयत्ननाची माहिती दिली.‌ह.भ.प.मेघश्याम महाराज यांना हि पाकिटे सुपूर्त केली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, अँड. दुसाने, भाऊसाहेब संजय पाटील, श्याम नरेंद्र पाटील यांनी सहकार्य केले. गोकुळ देवरे यांनी आभार मानले परिसरातील शेकडो नागरिकांनी नमस्कार करून दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post