-->

धनूर लोणकुटे येथे दिव्यांग दिनानिमित्ताने जीवनावश्यक किटचे वाटप धनूर लोणकुटे (राजकुमार खैरनार) दि.५ - धुळे तालुक्यातील धनूर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व अपंग बंधू आणि भगिनींना जीवनावश्यक संसारोपयोगी किटचे वाटप करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धनूर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायत येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी ग्रां. प. सदस्य राजकुमार खैरनार होते. यावेळी गावातील सर्व दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत मध्ये आमंत्रित करत त्यांचा सत्कार व सन्मान करून त्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे व संसारोपयोगी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच चेतन शिंदे यांनी सर्व दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या, तसेच त्यांना इतर सुविधा व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या आवश्यक सूचनाही दिल्या. सरपंच चेतन शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माणूस हा शरीराने दिव्यांग नसून तो मनाने असतो. आपण आपल्या मनात प्रेरणा घेऊन आपले मनोबल वाढवावे तसेच आपल्याला समाजासाठी, देश हितासाठी काहीतरी करायचे आहे याचे भान असू द्यावे, अशी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती केली. यावेळी सरपंच चेतन शिंदे,उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य ग्रामसेवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वाघ यांनी केले.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post