मुख्य जलवाहिनी,स्विस वॉल स्थलांतरित करा मग रस्त्याच्या कामाला सुरवात करावी :सरपंच शीतल शाह निजामपूर(परवेज सैय्यद) दि. ०८ : निजामपूर गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ ब या शेवाळी फाटा ते नंदुरबार महामार्गा बाबत निजामपूर ग्रामपालिका संरपच शितल गजानन शहा यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.राष्ट्रीय महामार्ग ७५३ ब, चेकाम सुरू असून या रस्त्याला बेघर वसाहत जवळील हनुमान मंदिर ते नविन पुला पर्यंत निजामपूर ग्रामपालिकेच्या मुख्य जलवाहिन्या व स्विस वॉल दाबल्या जात आहेत. परिणामी तेथील अडीचशे ते तिनशे लोकांचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनी व स्विस वॉल हे नविन जागेत स्थलांतरित करावे व रस्त्याखाली बंदिस्त गटार आहे, ती गटार देखील नविन जागेत स्थलांतर करून मिळावी. त्यानंतरच कामाला सुरुवात करावी. याबरोबरच निजामपूर रस्त्याच्या नविन पुलापासून ते साईबाबा मंदिरा पर्यंत ज्या उंचीचा रस्ता सद्यस्थितीत आहे, तसाच नवीन करण्यात यावा. त्याची उंची वाढवू नये व तसेच रस्त्याच्या बाजुला पाणी पुरवठ्याची मुख्य जलवाहिनी / स्विस वॉल आहे. त्यामुळे काम सुरु करण्याआधी ग्रामपालिकेला कळविण्यात यावे. या बरोबरच रस्ता उंच झाल्यास पावसाचे पाणी तसेच नवा व जुन्या रस्त्याचे अंतर उंचित कमी जास्त होणारआहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असल्याने या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा, असे ही सरपंच शितल शहा यांनी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.
byloksahi.varta.news
-
0