आयजी कडून उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल निजामपूर पोलीस स्टेशनला तीन प्रशस्तीपत्र निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२६ - साक्री तालुक्यातील निजामपूर- जैताणे पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सपोनि मयुर भामरे यांना त्रिश्रेणी निरीक्षणात उत्कृष्ट कामगीरीत प्रथम येऊन प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. गेल्या अनेक महिन्या पासून निजामपूर पोलीस स्टेशनचे नाव कामागिरी मध्ये मागे असून चांगला प्रभारी या गावाला मिळावा अशी गावातील नागरिकांना आशा लागली होती त्यात विधानपरिषद निवडणूक पूर्वी काही अधिकारी यांच्या बदल्या झाल्या त्यात निजामपूर चे सपोनि म्हणून मयूर भामरे यांनी चार्ज घेत चांगलीच कामगिरी सुरु केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी काही महिन्या पूर्वी पदभावर स्वीकारले होते.पदभार स्वीकारतच धडाके बाज कामगिरी सुरु केली. निजामपूर जैताणे पोलीस ठाण्यातील विषेश कामगीरीत अग्रगण्य असुन या दरम्यान आयजी दैर्यात त्रिश्रेणी त उत्कृष्ट कार्य दिसुन आले.गुन्हेगारीत,खुनातील गुन्हेगार,दरोडेखोरीत,भुरटी चोरी,घरफोडी,जातीय वाद,अश्या विविध श्रेणीत आपले कर्तव्य बजावताना दिसुन आले.या त्रिश्रेणी चाचणीत यशस्वी रित्या पुर्ण केल्या.काही दिवसापूरणी आयजी साहेब धुळे जिल्ह्याच्या इनीस्पेकशन साठी आले असता त्यांनी दहा प्रशस्ती पत्रापैकी ३ पत्र निजामपूर पोलीस स्टेशनला आयजी साहेब यांच्या कडून सन्मानीत करून गौरविण्यात आले.त्याच्या यशा बद्दल स्थानिक मुख्यालयातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच गावातील सामाजिक राजकिय स्थरातील मंडळी व पत्रकार बांधवान कडून शुभेच्छा देण्यात आल्या.
byloksahi.varta.news
-
0