धुळे शहरातील व बाहेरील जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आझादनगर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी धुळे दि.०५ - धुळे शहरातील व बाहेरील जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आझादनगर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी दिनांक ०५ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती गंगाराम पवार आझादनगर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गुप्त प्रमाणे एक इसम हा मार्केट परिसरात विना नंबर प्लेट काळया रंगाची मोटर सायकल वर संशयीत रित्या फिरत आहे, सदर इसमाचा शोध घेवुन बातमिची खात्री करण्याबावत पोनि, पवार यांनी पोलीस स्टेशनचे शोच पथकातील अंमलदारांना तात्काळ रवाना केले असता, १४.०० वाजेच्या सुमारास मुरादशाह बाबा दर्गेजवळ एक इसम काळ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली बजाज पल्सरवर फिरतांना दिसुन आला असता त्यास शोचपथकातील अंमलदारांनी त्याचे जवळील वाहनाबाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे त्याच्यावर संशय आल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरची मोटारसायकल हि चंदन नगर देवपुर, बुळे येथुन चोरल्याची कबुली दिली. त्यास अधिक विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथिदार यांचेसह अजून इतर ठिकाणहुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्याचे ताव्यातील बजाज पल्सर मोटर सायकल बावत देवपुर पोलीस स्टेशन गुरनं २८४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे व इतर साथीदारांसह चोरलेल्या मोटारसायकली पैकी होन्डा कंपनीची शाईन चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव गुरनं. ३८६/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याबाबत माहिती मिळाली आहे. तसेच इतर अजुन ०५ अश्या एकुण ०७ मोटारसायकल सदर इसमाकडुन जप्त करण्यात आल्या असुन त्यांचे वर्णन खालील प्रमाणे-अ.क्र.किंमत ४०,०००/-जप्त मुद्देमालाचे वर्णनबाजाज कंपनीची पल्सर मॉडेल असलेली काळया रंगाची मो.सा. तीचा चेचिस क्र. MD२६१३६४३JCM२०२४८ इंजिन क्र. DKYCM१९८०८गुन्हा दाखल माहितीदेवपुर पोलीस स्टेशन गुरनं. २८४/२०२४ भा.न्या.सं. ३०३(२) प्रमाणे कलम३०,०००/-होन्डा कंपनीची शाईन मॉडेल असलेली रखाडी रंगाची निळे पांढरे पड्ढे असलेली मो.सा. तीचा चेचिस क्र. ME४JC६५२LF७१०९४२६ इंजिन क्र. JC६५६७०३६५८४२चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन गुरनं. ३८६/२०२४ भा.न्या.सं. ३०३(२) प्रमाणे कलम२२०,०००/-होन्डा कंपनीची डिओ (Dio) मॉडेल असलेली लाल रंगाची मो.सा. तीचा चेचिस क्र. ME४JF३९ABHU०४०५२५ इंजिन क्र. JF३९E-U-११६५६०५२०,०००/-हिरो कंपनीची स्ल्पेडर मॉडेल असलेली काळया रंगाची मो.सा. तीचा चेचिस क्र. MBLHA१०६३EHB६५४२९ इंजिन क्र. HAPOELEMB००४२१२०,०००/-बाजाज कंपनीची प्लॅटीना मॉडेल असलेली राखाडी रंगाची मो.सा. तीचा चेचिस क्र. MD२A७६AY६KWJ०२१३१ इंजिन क्र. PFYWKJ३५६६०६३०,०००/-४५होन्डा कंपनीची शाईन मॉडेल असलेली रखाडी रंगाची मो.सा. तीचा चेचिस क्र. MEXJC३६PHE७०१५७९१ इंजिन क्र. JC३६E- ७३६२६२४२ २०,०००/-हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेल असलेली काळया रंगाची मो.सा. तीचा चेचिस क्र. MBLHA११ATF९४१४६७३ इंजिन क्र. HA१९EJFSH११५७६१एकुन किंमत १,८०,०००/- (अक्षरी किंमत रुपय एक लाख ऐशी हजार मात्र)सदर संशयीत हा विधी संघर्षग्रस्त बालक असलेबाबत समजले असून सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे आझाद नगर पोस्टेचे पोनि. निवृत्ती पवार, पोसई/समाधान सुरवाडे, व त्यांचे पथकातील पोहेकों योगेश शिरसाठ, पोहेकॉ संदीप कढरे, पोहेकों गौतम सपकाळे, पोहेकों/शांतीलाल सोनवणे, पोहेकों/रफिक पठाण, पोहेकों योगेश शिंदे, पोकों/मक्सुद पठाण, पोकों/पंकज जाँचळे यांनी सदरची कारवाई केली आहे,


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post