येरवडा येथिल उर्दू शाळेतील मुलांना आदिल प्रकाशन तर्फे मोफत पुस्तके वाटप निजामपूर (परवेज सैय्यद) दि.२५ - दिनांक २१ जानेवारी रोजी येरवडा येथील शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना आदिल पब्लिकेशन चे मालक श्री कामील शेख यांनी उर्दू लेखन वाचन गुलज़ारे उर्दू ची पुस्तके निशुल्क वाटली आणि भारताची पहिली शिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा उर्दू भाषेमध्ये अनुवाद केलेल्यात्या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सदर पुस्तकाचा अनावरण येरवडा विभागाचे सहायक शिक्षण अधिकारी श्री जयेश शेंडकर सर व पुणे महानगर पालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री अरुण भाऊ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी आदिल पब्लिकेशन चे मालक कामिल शेख तसेच येरवडा हलका कोर कमिटीचे अध्यक्ष श्री लतीफ माहुत, सामाजिक कार्यकर्ते श्री वसीम शेख , येरवडा हलका कोर कमिटीचे सदस्य एजाज़ खान.तसेच शहिद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक चे ४६ बी चे मुख्याध्यापक श्री जावेद सर, १२९ बी च्या मुख्याध्यापिका सौ,कौसर आपा, ८४ बी च्या मुख्याध्यापिका सौ, अफरोज आपा, २०८ बी च्या मुख्याध्यापिका सौ, वहिदा शेख आपा आणि सर्व शिक्षक गण शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक, उपस्थित होते साक्री तालुक्यातील भामेर येथिल मुळ रहिवाशी कामील शेख हे पुणे येथे स्थायिक झाले असून त्यांची आदिल पब्लिकेशन्स ही पुस्तक प्रकाशन संस्था नावारूपास आली आहे
byloksahi.varta.news
-
0