चिमुकली आमयरा ने ठेवला कडकडित उन्हात रमजान चा दुसरा रोजा निजामपूर (परवेज सैय्यद) दि. ०३ - चिमुकलेरोजेदार यंदाच्या रमजान पर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे हवामान खात्याने धुळे जिल्हयाला विशेषतः उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जनतेलाविशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.असताना सुद्धा या वर्षी मोठ्याप्रमाणावर लहान मुलांकडून रोजा केला जात आहे. अगदी ६ ते ९ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. मोठ्यांनाही कासावीस करून टाकणारे रोजे लहान मुलांकडून केले जात असल्याने सध्या यांच्याबद्दलच सर्वत्र चर्चा सुरू आहे.यंदा १४ ते १५ तासांचा रोजा आहे. इतक्या तासांमध्ये निर्जलरोजा करणे, अतिशय जिकरीचे आहे. त्यात दिवसा कडाक्याचे ऊन जाणवत आहे. असे असताना कुठलीही चिंता न करता निर्धास्त चिमुकले रोजा करत आहे. अगदी ६ ते ९ वयोगटातील चिमुकल्याचादेखील रोजा करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.अमायरा कामिल सय्यद रा. निजामपूर ता. साक्री जि. धुळेयेथील या ६ वर्षीय चिमुकलिने रमजान चा दुसरा रोजा ठेवण्यात आला. तिच्या रोजाकरण्याने सय्यद कुटुंबीयांच्या घरी ईदच्या महिनाभर पूर्वीच ईद साजरीझाली. सर्व कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परिसरातील मुस्लिमबांधवांसह गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
byloksahi.varta.news
-
0