-->

सरवड गावाचे भूमिपुत्र प्रा. मच्छिंद्र ठाकरे यांना Ph. D. पदवी प्राप्त धुळे दि.०८- धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे, भाऊसाहेब ना . स. पाटील साहित्य आणि मु. फि. मु. अ. वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा .मच्छिंद्र गुलाब ठाकरे यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या माननीय कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते 'विद्यावाचस्पती' (पीएच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील सरवड या लहानशा गावातील एका आदिवासी कुटुंबात जन्माला आलेले मच्छिंद्र ठाकरे हे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत करत हिंदी या विषयातील सेट, पी.एच.डी. अशा परीक्षा उत्तीर्ण करतात आणि प्राध्यापक पदापर्यंत पोहचतात. त्यांचा हा प्रवास आदिवासी तरुणांसाठी दिशादर्शक आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मजुरी करत आपल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी भागवला. त्याचा जन्म आदिवासी समूहातील भिल्ल या जातीत झाला. घरची परिस्थिती बेताचीच असताना शिक्षणाची असणारी ओढ त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. संशोधनाच्या काळातच मोठा भाऊ युवराज ठाकरे यांच्या अकाली निधनाने मच्छिंद्र ठाकरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संशोधनाच्या काळात दोन मोठे भाऊ आणि वडिलांच्या निधनाचे दुःख असताना ते कुठे ही खचले नाहीत. काहीही झाले, तरीही त्यांनी आपल्या संशोधनातील ओढ कमी होऊ दिली नाही. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळेच ते आज सरवड या गावातील पहिले नेट, सेट आणि पी.एच.डी. या बहुमानाच्या पदव्या घेऊन प्राध्यापक या पदावर विराजमान झालेले प्राध्यापक ठरलेले आहेत. त्यांच्या या यशामध्ये सरवड गावातील ग्रामस्थ सहभागी आहेत.आपल्या आदिवासी बोलीतील उच्चारण करायची कायमची सवय त्यांनी प्रयत्नपूर्वक सोडून हिंदी सारख्या भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले. शिक्षणाने माणूस निर्भय बनला पाहिजे, या स्वामी विवेकानंदांच्या विधानाचा प्रत्येक डॉ. मच्छिंद्र ठाकरे यांच्या जीवनात प्रत्यक्षात येताना दिसतो. बहुजनांसाठी स्थापन झालेल्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार (धुळे ग्रामीण) मा. कुणालजी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ .संजय टी. पाटील, माजी प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, माजी प्राचार्य डॉ. रवींद्र वाघ, सध्याचे प्राचार्य डॉ. जितेंद्र तलवारे, मार्गदर्शक डॉ. प्रमोद पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


--- इसे भी पढ़ें ---

Post a Comment

Previous Post Next Post